४३.३२ लाख खात्यांमध्ये कर्जमाफी रक्कम जमा; मुख्यमंत्री कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:48 AM2019-06-25T04:48:10+5:302019-06-25T04:48:44+5:30

राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी २४ हजार कोटींची रक्कम राज्य सरकारने उपलब्ध करून दिली.

 43.32 Lakhs of Debt Waiver; Chief Minister's Office | ४३.३२ लाख खात्यांमध्ये कर्जमाफी रक्कम जमा; मुख्यमंत्री कार्यालय

४३.३२ लाख खात्यांमध्ये कर्जमाफी रक्कम जमा; मुख्यमंत्री कार्यालय

Next

मुंबई : राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी २४ हजार कोटींची रक्कम राज्य सरकारने उपलब्ध करून दिली. त्यातील ४३.३२ लाख खात्यांमध्ये प्रत्यक्ष पैसे जमा झाले आहेत, असे स्पष्टीकरण लोकमतने २४ जूनच्या अंकात दिलेल्या वृत्ताबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे.
४३.३२ लाख खात्यांमध्ये प्रत्यक्ष पैसे जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात विधानसभेत २१ जून रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरात दिलेली होती. असे असताना केवळ २० लाख खात्यांमध्येच पैसे जमा झाले, असे वृत्त दिशाभूल करणारे आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात ४३.३२ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे सांगतानाच ६.५० लाख खात्यांमध्ये ५५५२ कोटी रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला बँकांनी वेग दिल्याचे आणि प्रामुख्याने ही खाती ओटीएसशी संबंधित असल्याचेही सांगितले होते, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

Web Title:  43.32 Lakhs of Debt Waiver; Chief Minister's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.