मुंबई : कोरोना बाधित ४३४ रुग्ण शुक्रवारी आढळून आले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १६ हजार ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०६ टक्के एवढा आहे. रुग्ण दुपट्टीचा कालावधी १२८९ दिवसांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख ३७ हजार १६४ रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी ३८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण सात लाख १३ हजार ९९२ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या चार हजार ६५८ सक्रीय रुग्ण मुंबईत आहेत. दिवसभरात मृत्युमुखी पडलेल्या तीनही रुग्णांना सहव्याधी होत्या. यापैकी दोन रुग्ण पुरुष आणि एक रुग्ण महिला होती. मृत्यूमुखी पडलेले तीनही रुग्णांचे वय ६० वर्षांवरील होते. दिवसभरात ४० हजार ४४३ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ९८ लाख ८४ हजार ९३१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.