राज्यात दिवसभरात ४,३६५ कोरोना बाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:08 AM2021-08-21T04:08:33+5:302021-08-21T04:08:33+5:30
मुंबई : राज्यात शुक्रवारी ४ हजार ३६५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधितांची ...
मुंबई : राज्यात शुक्रवारी ४ हजार ३६५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६४ लाख १५ हजार ९३५ इतकी झाली आहे. राज्यभरात सध्या ५५ हजार ४५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, दिवसभरात ६ हजार ३८४ रुग्ण बरे झाल्याने आजपर्यंत एकूण बरे झालेल्यांची संख्या ६२ लाख २१ हजार ३०५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७ टक्के एवढे झाले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी १०५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ३५ हजार ६७२ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. आजपर्यंत तपासलेल्या ५ कोटी १९ लाख २१ हजार ७९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख १५ हजार ९३५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २२ हजार २२१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ७४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत