Join us

विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या ४३९ परीक्षा ऑक्टोबरपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:37 PM

मुंबई विद्यापीठातर्फे तारखा जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईविद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या हिवाळी सत्राच्या ४३९ परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू होत आहेत. तारखेसोबतच ८४ परीक्षांचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तृतीय वर्ष बी.कॉम. सत्र ५ ची परीक्षा २६ ऑक्टोबर रोजी, तृतीय वर्ष बी.ए. व बी.एस्सी. सत्र ५ परीक्षा ३० ऑक्टोबर, बी.ए. व एम.एस्सी. सत्र ५ ची परीक्षा २४ नोव्हेबर व बी.कॉम. स्वयं अर्थसाहाय्य अभ्यासक्रमाच्या सत्र ५ च्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली.दरवर्षी चार विद्याशाखांच्या पाचशेपेक्षा जास्त परीक्षा घेत असते.

विद्यापीठाने २०२३-२४ च्या हिवाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या एकूण ६८ परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ६३ परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या २४० परीक्षा व आंतरविद्या शाखेच्या ६८ अशा एकूण ४३९ परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 

विद्यापीठ परीक्षा तारीख बी.कॉम. सत्र ५ : २६ ऑक्टोबर बी.ए. सत्र ५ : ३० ऑक्टोबर बी.एस्सी. सत्र ५ : ३० ऑक्टोबर बी.एस्सी. आयटी सत्र ५ : २४     नोव्हेंबर बी.ए., एम.एस्सी. सत्र ५ : २४     नोव्हेंबर बी.कॉम. फायनान्शियल मार्केट,     बी.कॉम. बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स,     बी.कॉम. अकाउंटिंग ॲण्ड     फायनान्स, बी.कॉम. इन्व्हेस्टमेंट     मॅनेजमेंट व बी.कॉम. ट्रान्स्पोर्ट     मॅनेजमेंट सत्र ५ : १ डिसेंबर     २०२३ 

विद्या शाखानिहाय परीक्षा संख्या

टॅग्स :मुंबईविद्यापीठ