राज्यातील ४४ अधिकारी, अंमलदारांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:09 AM2019-01-26T05:09:01+5:302019-01-26T05:09:12+5:30

सोलापूर ग्रामीणचे अधीक्षक मनोज पाटील, मुंबईतील सहायक आयुक्त शरद नाईक, दिनेश जोशी, कोल्हापुरातील उपअधीक्षक सतिश माने यांच्यासह राज्य पोलीस दलातील ४४ अधिकारी, अंमलदारांना उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर करण्यात आली आहेत.

The 44 officers and officials of the state declared 'President's Police Medal' | राज्यातील ४४ अधिकारी, अंमलदारांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

राज्यातील ४४ अधिकारी, अंमलदारांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

Next

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन सिंह, मुंबई परिमंडळ -६ चे उपायुक्त शहाजी उमाप, सोलापूर ग्रामीणचे अधीक्षक मनोज पाटील, मुंबईतील सहायक आयुक्त शरद नाईक, दिनेश जोशी, कोल्हापुरातील उपअधीक्षक सतिश माने यांच्यासह राज्य पोलीस दलातील ४४ अधिकारी, अंमलदारांना उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. देशभरातील एकूण ८५५ पोलिसांना पदके जाहीर झाली आहेत.
या वर्षी राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने (पीपीएमजी) गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये अप्पर महासंचालक बिपीन सिंह यांच्यासह राज्य राखीव दलातील गट क्रमांक ११, नवी मुंबई येथील सहायक समादेशक भास्कर महाडिक, मुंबईतील सहायक आयुक्त दिनेश जोशी व रत्नागिरीतील सहायक फौजदार विष्णू नागले यांचा समावेश आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी परिमंडळ-६ उपायुक्त शहाजी उमाप, सहायक आयुक्त शरद नाईक, वरिष्ठ निरीक्षक नितीन अलकनुरे, ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक मंगेश सावंत, नवी मुंबई गुन्हे शाखेतील वरिष्ठ निरीक्षक सचिन राणे आदींचा समावेश आहे.

>पोलीस पदक विजेते (कंसात नियुक्तीचे ठिकाण) :
निरीक्षक गणपत तरंगे (प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड), अरविंद गोकुळे (प्रशिक्षण केंद्र खंडाळा), संजय पुरंदरे (नागपूर ग्रामीण), नंदकुमार गोपाळे, सचिन कदम (दोघे मुंबई), गजानन पवार (पुणे शहर), धनश्री करमरकर (पोलीस महासंचालक कार्यालय), सहायक निरीक्षक अनिल परब (गुप्तवार्ता विभाग), उपनिरीक्षक अर्जुन शिंदे (पालघर), सत्यवान राऊत (राज्य गुप्तवार्ता विभाग), सहायक फौजदार नंदकुमार शेलार (मुंबई), अशोक भोसले (पुणे), विलास मोहिते (नाशिक), प्रदीप पाटील (रायगड), राजकुमार वरुडकर (अमरावती शहर), लक्ष्मण थोरात (पुणे), मोहन घोरपडे (सातारा),
गौरीधर देसाई (एसआरपी गट-२ पुणे) पुरुषोत्तम देशपांडे (सातारा), अमरसिंग चौधरी (औरंगाबाद ग्रामीण), मनोहर खनगावकर (एसीबी, कोल्हापूर), शेख झाकीर हुसेन गुलाम हुसेन (नाशिक), दत्तात्रय चौधरी (पुणे ग्रामीण), सुनील कुलकर्णी (पुणे), हवालदार सर्वश्री गणपती डफळे (एसीबी, मुंबई), कृष्णा जाधव, पांडुरंग तळावडेकर, अरुण कदम, दयाराम मोहिते, भानुदास मनवे, दत्तात्रय कुढले (सर्व मुंबई) व विनोद ठाकरे(अकोला)
>जबादारीचे
भान वाढले
महाराष्टÑ पोलीस दलात सेवा करण्यास मिळणे हीच सौभाग्याची बाब असते. जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे खूप आनंद झाला असून, त्यामुळे जबाबदारीचे भान वाढले आहे.
- बिपीन सिंह,
अप्पर महासंचालक, एसीबी.
>श्रेय सर्व सहकाºयांना
पोलीस पदक मिळाल्याने आनंद झाला असून, त्याचे श्रेय माझ्या सर्व सहकाºयांना आहे. पदकापेक्षा कुटिल गुन्ह्याची उकल आणि तक्रारदार, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण झाल्यास आपल्याला अधिक आनंद होतो.
- शहाजी उमाप,
उपायुक्त परिमंडळ-६, मुंबई.

Web Title: The 44 officers and officials of the state declared 'President's Police Medal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस