राज्यात काेराेनाचे ४४ हजार १९९ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:23 AM2021-02-05T04:23:06+5:302021-02-05T04:23:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शनिवारी १,५३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आजपर्यंत एकूण १९,२७,३३५ रुग्ण काेराेनामुक्त ...

44,199 active patients of Kareena in the state | राज्यात काेराेनाचे ४४ हजार १९९ सक्रिय रुग्ण

राज्यात काेराेनाचे ४४ हजार १९९ सक्रिय रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शनिवारी १,५३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आजपर्यंत एकूण १९,२७,३३५ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२३ टक्के आहे. सध्या ४४ हजार १९९ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी २,६३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या २०,२३,८१४ झाली असून मृतांचा आकडा ५१ हजार ४२ आहे.

दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ४२ मृत्यूंपैकी १८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ४२ मृत्यूमध्ये मुंबई ७, ठाणे मनपा १, मीरा-भाईंदर मनपा १, पालघर १, नाशिक मनपा २, नंदुरबार २, पुणे मनपा ११, सांगली १, जालना ४, नांदेड मनपा १, वर्धा ४, भंडारा २, गडचिरोली ३ या रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४५,५९,१६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,२३,८१४ (१३.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९१,९७५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये, तर २,३२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

..........................

Web Title: 44,199 active patients of Kareena in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.