Join us

राज्यात काेराेनाचे ४४ हजार १९९ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:23 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शनिवारी १,५३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आजपर्यंत एकूण १९,२७,३३५ रुग्ण काेराेनामुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शनिवारी १,५३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आजपर्यंत एकूण १९,२७,३३५ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२३ टक्के आहे. सध्या ४४ हजार १९९ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी २,६३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या २०,२३,८१४ झाली असून मृतांचा आकडा ५१ हजार ४२ आहे.

दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ४२ मृत्यूंपैकी १८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ४२ मृत्यूमध्ये मुंबई ७, ठाणे मनपा १, मीरा-भाईंदर मनपा १, पालघर १, नाशिक मनपा २, नंदुरबार २, पुणे मनपा ११, सांगली १, जालना ४, नांदेड मनपा १, वर्धा ४, भंडारा २, गडचिरोली ३ या रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४५,५९,१६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,२३,८१४ (१३.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९१,९७५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये, तर २,३२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

..........................