मुंबईत कोरोनाचे ४४६ रुग्ण; सहा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:07 AM2021-09-25T04:07:28+5:302021-09-25T04:07:28+5:30
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आहे. शुक्रवारी दिवसभरात ४४६ बाधित रुग्ण आढळून आले. तर ...
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आहे. शुक्रवारी दिवसभरात ४४६ बाधित रुग्ण आढळून आले. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १६ हजार ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०६ टक्के एवढा आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ११८७ दिवसांवर आला आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख ४० हजार ३०७ रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी ४३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण सात लाख १६ हजार ९४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या चार हजार ८०९ सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. दिवसभरात मृत्युमुखी पडलेल्या सहापैकी पाच रुग्णांना सहव्याधी होत्या. यापैकी तीन रुग्ण पुरुष आणि तीन रुग्ण महिला होत्या.
मृत्युमुखी पडलेल्या दोन रुग्णांचे वय ४० ते ६० या वयोगटातील होते. तर चार रुग्ण ६० वर्षांवरील होते. दिवसभरात ३६ हजार ५३६ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण एक कोटी एक लाख ३६ हजार ८६३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.