एसटीच्या १८०० सफाई कामगारांवर बेकारीची कु-हाड, सफाईसाठी खासगी कंपनीला ४४७ कोटींचे कंत्राट
By महेश चेमटे | Published: December 9, 2017 04:48 AM2017-12-09T04:48:33+5:302017-12-09T04:49:20+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) १८०० सफाई कर्मचा-यांवर बेकारीची कु-हाड कोसळणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) १८०० सफाई कर्मचा-यांवर बेकारीची कु-हाड कोसळणार आहे. खासगी कंपनीला बस आगार आणि स्थानके स्वच्छ करण्याचे ४४७ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. १ डिसेंबरपासून या कंत्राटी कामाची सुरुवात होईल. या घडामोडींमध्ये महामंडळाने राज्यभर कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना पर्यायी नोकरी देण्याच्या धोरणाला स्थगिती दिली आहे. यामुळे कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे खासगी कंत्राटदारांना ‘अच्छे दिन’ येत असल्याने एसटी ‘खासगीकरणा’च्या दिशेने जात असल्याची चर्चा एसटी वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे.
एसटी महामंडळाने मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागातील ३१ आगारांसह बस स्थानकांची सफाई सुमारे १८०० एसटीचे कामगार करत होते. मात्र एसटीने सफाईचे ४४७ कोटींचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. तीन वर्षे ही खासगी कंपनी स्थानकातील स्वच्छता करणार आहे.
एसटी महामंडळात अनुकंपा तत्त्वावर तसेच पर्यायी नोकरीमध्ये सफाई कामगार व स्वच्छक पदामध्ये नेमणूक देण्याची तरतूद आहे. मात्र खातेप्रमुखांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या धोरणाला स्थगिती देण्यात येत आहे. यामुळे पर्यायी धोरणानुसार सफाई कामगारांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे परिपत्रक कामगार विभागाच्या महाव्यवस्थापकांनी काढले आहे. या परिपत्रकामुळे महामंडळातील १८०० हून अधिक सफाई कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळणार आहे.
वेतनाबाबत २२ डिसेंबर रोजी महामंडळ न्यायालयात अहवाल सादर करणार आहे. महामंडळातील सफाई कामगारांना पर्यायी नोकरी न दिल्यास त्यांच्यावर उपासमारीची कुºहाड कोसळणार आहे. विशेषत: सफाई कर्मचाºयांमध्ये महिलांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
सफाईगार पदांमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे, ही धोरणात्मक बाब आहे. कामगार करारातील कलम ११२ नुसार त्यात बदल करण्यापूर्वी मान्यताप्राप्त संघटना म्हणून आमच्या संघटनेशी चर्चा करणे आवश्यक आहे. मुळात स्वच्छक पदाची निर्मिती करताना साहाय्यक पदे गोठण्यात आली होती. ही पदे निर्माण करून भरण्याच्या व अशा पदांवर अनुकंपा तत्त्वावर नेमणूक देण्याचा निर्णय झालेला होता.
परिपत्रकामुळे या निर्णयाचा भंग होत आहे. कर्मचाºयांवर शारीरिक अपंगत्व आल्यास व वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरल्यास अशा कर्मचाºयांना स्वच्छक, सफाईगार किंवा शिपाई पदावर नियुक्ती करण्याचे १९९६-२००० च्या कामगार करारात मान्य केले आहे. परिणामी हे परिपत्रक रद्द करण्यात यावे. प्रशासन काहीही आश्वासने देत असले तरी सध्या त्यात लेखी काहीही नाही, असे कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी सांगितले.
कर्मचाºयांना वाºयावर सोडणार नाही
एसटी महामंडळातील १८०० सफाई कर्मचाºयांना बेकार होऊ देणार नाही. या सफाई कर्मचाºयांची समकक्ष पदावर नेमणूक करण्यात येईल. एसटी वर्कशॉप आणि अन्य ठिकाणी हे कर्मचारी काम करतील. महामंडळाला सफाई कामगारांची आवश्यकता आहे. महामंडळ कोणत्याही कर्मचाºयांना वाºयावर सोडणार नाही.
- अविनाश भोसले,
जनसंपर्क अधिकारी