तराफा पी-३०५ दुर्घटनेतील ४५ मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:06 AM2021-05-24T04:06:23+5:302021-05-24T04:06:23+5:30
२५ मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तराफा पी-३०५ दुर्घटनेत रविवारी रात्रीपर्यंत ७० मृतदेह पोलिसांच्या ...
२५ मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तराफा पी-३०५ दुर्घटनेत रविवारी रात्रीपर्यंत ७० मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यापैकी ४५ मृतदेहांची ओळख पटली असून, ते कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत, तर अन्य २५ मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
या दुर्घटनेप्रकरणी तराफावरील मुख्य अभियंता रेहमान शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी कॅप्टन राकेश बल्लावसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यलोगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यापैकी ४५ मृतदेहांची ओळख पटली असून, ते कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे, तर अन्य २५ मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.