Join us  

यार्ड रीमॉडेलिंगसाठी ४५ रेल्वेगाड्या रद्द; काही मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 6:00 AM

नॉन इंटरलॉकिंगचे काम २१ आणि २२ जुलै रोजी ३८ तासांचे असेल. त्यासाठी ४५ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. 

मुंबई : अकोला-रतलाम विभागातील गेज रूपांतरण कामाच्या संदर्भात खंडवा यार्ड रीमॉडेलिंग दरम्यानच्या प्री-इंटरलॉकिंग व नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी  मध्य रेल्वे वाहतूक आणि पॉवर ब्लॉक्स घेणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे (डब्ल्यूआर) आणि मध्य रेल्वे (सीआर) दरम्यान चांगली सुविधा उपलब्ध होईल. 

खांडवा हे भुसावळ व भोपाळ विभागांमधील इंटरचेंजच्या मध्यवर्ती भागात असून, या कामासाठी काही मेल, एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. नॉन इंटरलॉकिंगचे काम २१ आणि २२ जुलै रोजी ३८ तासांचे असेल. त्यासाठी ४५ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. 

४ जुलैपासून २० जुलैपर्यंतचे १६ दिवसांचे प्री-इंटरलॉकिंग काम सुरू झाले आहे. नॉन इंटरलॉकिंगचे काम २१ आणि २२ जुलै रोजी होईल. त्यामुळे १४ जुलै रोजी रीवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, पाटणा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, दादर-गोरखपूर एक्स्प्रेस, १५ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रीवा एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ- मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस, रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, दादर- बलिया एक्स्प्रेस, जबलपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, १६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पाटणा एक्स्प्रेस, दादर-गोरखपूर एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जबलपूर एक्स्प्रेस, गोरखपूर-दादर एक्स्प्रेस, १७ जुलै रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल, बलिया-दादर एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस, पाटणा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, आदी गाड्या केल्या आहेत.

टॅग्स :मुंबईभारतीय रेल्वेमध्य रेल्वे