Join us

वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 09:31 IST

आरपीएफ, शहर पोलिस, जीआरपीच्या बंदोबस्तात कारवाई 

मुंबई - पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाजवळ असलेली ४५ अनधिकृत बांधकामे गुरुवारी रेल्वेने आरपीएफ, शहर पोलिस आणि जीआरपीच्या मदतीने जमीनदोस्त केली.  ही सर्व अनधिकृत बांधकामे वांद्रे पूर्व बाजूच्या रेल्वे ओव्हरब्रिजजवळच्या रेल्वेच्या हद्दीत उभारली होती.

या कारवाईसाठी जीआरपीचे ५६, आरपीएफचे ३४, शहर पोलिसांचे १७ अधिकारी आणि शिपाई असा फौजफाटा तैनात केला होता.  बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी २५ कामगार, २ जेसीबी आणि १ ट्रक वापरण्यात आला होता, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. 

...यामुळे उगारला बडगा

पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृत उभारलेल्या बांधकामांमुळे रेल्वेच्या सुरक्षिततेला आणि वाहतुकीला धोका निर्माण झाल्याने ही कारवाई केली असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेच्या हद्दीत बांधलेली अनधिकृत बांधकामे बेकायदेशीर असून ती तत्काळ हटवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :रेल्वे