मेट्रोसाठी ४,५००; तर शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पासाठी ३ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 02:24 AM2021-02-24T02:24:34+5:302021-02-24T02:24:44+5:30

मेट्रोसाठी ४,५००; तर शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पासाठी ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

4,500 for metro; 3,000 crore for Shivdi-Nhava Sheva project | मेट्रोसाठी ४,५००; तर शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पासाठी ३ हजार कोटी

मेट्रोसाठी ४,५००; तर शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पासाठी ३ हजार कोटी

Next

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विविध पावले उचलली जात असून, मंगळवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत १२ हजार ९६९.३५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली आहे. 
या अर्थसंकल्पात सार्वजनिक वाहतूक सेवा, मेट्रो प्रकल्प आणि पायाभूत सेवा-सुविधांवर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. मेट्रोसाठी ४,५००; तर शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पासाठी ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २०२१-२२ या अर्थसंकल्पीय वर्षात १२ हजार ९६९.३५  कोटी खर्च अपेक्षित असून, ९ हजार ८३३.७५ कोटी रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक वाहतूक, मेट्रो प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होईल. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी व कमी वेळेत होणे शक्य होईल, असा दावा प्राधिकरणाने केला आहे. त

पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पृष्ठभागाच्या कामकाजाकरिता आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कामकाजांकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यास प्राधिकरणाने मंजुरी दिली.
 

Web Title: 4,500 for metro; 3,000 crore for Shivdi-Nhava Sheva project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.