Join us

मुंबईत ४५३८ इमारती सील, ७९८ बाधित क्षेत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 2:15 AM

धोका वाढतोय : आतापर्यंत ५० हजार कोरोनाबाधित

मुंबई : लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले करण्यात येत असल्याने मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र या काळात बाधित क्षेत्र आणि सील इमारतींचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत ३०९७ इमारती सील तर ६९६ बाधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली होती. परंतु, गेल्या आठवडाभरात ७९८ बाधित क्षेत्रे तर ४५३८ इमारती सील केल्याचे समोर आले आहे.

मुंबईत आतापर्यंत ५० हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यापूर्वी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यास संपूर्ण परिसरात प्रवेशबंदी करण्यात येत होती. यामुळे मुंबईतील बाधित क्षेत्रांची आकडेवारी अडीच हजारांहून अधिक होती. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हा नियम बदलून संपूर्ण परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर न करता पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या इमारतीला अथवा मजला सील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाधित क्षेत्रांची यादी सहाशेवर तर सील केलेल्या इमारतींची यादी हजाराहून अधिक असल्याचे आढळून आले.केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू करण्यात आलेले आहे. त्यानुसार मुंबईत ३ जूनपासून टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरू करण्यात येत आहेत. त्यापैकी सम -विषम पद्धतीने दुकाने, मर्यादित कर्मचारी संख्येने खासगी व सरकारी कार्यालये, जॉगिंग-फेरफटका, वृत्तपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. तसेच गेल्या काही काळातील उपाययोजनांमुळे रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण २४.५ दिवसांवर गेल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्याच वेळी सील इमारती आणि बाधित क्षेत्रांचे प्रमाण मात्र वाढत आहे़सर्वाधिक इमारती सील असलेले विभागच्आर मध्य बोरीवली, गोराई - ३४५च्पी दक्षिण गोरेगाव, आरे कॉलनी - २७०च्के पश्चिम अंधेरी प., विलेपार्ले प., जुहू- २६९च्७९८ बाधित क्षेत्रांत एकूण १८ हजार ९५७ रुग्ण सापडले आहेत. तर ४२ लाख १८ हजार नागरिक या बाधित क्षेत्रांमध्ये राहतात.च्४५३८ सील इमारतींमध्ये नऊ हजार ९५६ रुग्ण सापडले आहेत,तर आठ लाख दोन हजार नागरिक या इमारतींमध्ये राहतात.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या