गेल्या १० महिन्यांत क्रेडिड कार्ड फसवणुकीच्या ४५५ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:24 AM2020-12-11T04:24:45+5:302020-12-11T04:24:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरून फसवणुकीच्या घटना डोके वर काढत आहेत. गेल्या दहा ...

455 cases of credit card fraud in last 10 months | गेल्या १० महिन्यांत क्रेडिड कार्ड फसवणुकीच्या ४५५ घटना

गेल्या १० महिन्यांत क्रेडिड कार्ड फसवणुकीच्या ४५५ घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरून फसवणुकीच्या घटना डोके वर काढत आहेत. गेल्या दहा महिन्यांत क्रेडिट कार्ड फसवणुकीचा ४५५ घटनांची नोंद मुंबई पोलिसांच्या दप्तरी झाली आहे. त्यामुळे आपल्या कार्डची माहिती कुणालाही शेअर करू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

बँकेतून बोलतोय म्हणत खातेदारांना कोट्यवधीचा गंडा घालण्यात येत आहे. यात ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसत आहे. क्रेडिड कार्डवर बोनस पॉइंट मिळाल्याचे सांगून खातेदारांच्या खात्यातून लाखो रुपये काढण्यात येत आहेत.

तसेच ऑनलाइन खरेदीच्या व्यवहारादरम्यान ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी संबंधित संकेतस्थळाविषयी माहिती घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी अशा फेक कॉल्ससह बनावट संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांत क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या ४५५ घटना समोर आल्या आहेत. यापैकी अवघ्या १३ गुह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात ७०० घटनांची नोंद झाली होती.

त्यापैकी ३६ गुह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी गेल्या काही दिवसांत याचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या काळात मंडळी ऑनलाइन व्यवहारावर भर देत आहेत. याचाच फायदा घेत ही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करीत आहेत.

सायबर ठगांपासून सावध राहण्याबाबत मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून जनजागृती करण्यात येत आहे. आपले पासवर्ड कुणाला समजणार नाही, असे ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Web Title: 455 cases of credit card fraud in last 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.