Join us

मुंबईत दिवसभरात ४५८ रुग्ण, ६ मृत्यू -सक्रिय रुग्ण ४ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:10 AM

मुंबई : सणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल झाल्याने सार्वजनिक ठिकाणी लोकांचा वावर वाढला आहे, शिवाय बाजारपेठाही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. ...

मुंबई : सणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल झाल्याने सार्वजनिक ठिकाणी लोकांचा वावर वाढला आहे, शिवाय बाजारपेठाही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. परिणामी, मुंबईत मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख चढता आहे.

शहर उपनगरांत गुरुवारी ४५८ रुग्णांची नोंद झाली असून ६ मृत्यूची नोंद झाली आहे. ३३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ४८ हजार ६६ वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा १६ हजार १० वर पोहोचला आहे. शहर उपनगरांत रुग्ण बरे होण्याची संख्या ७ लाख २५ हजार ५८१ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार २०६ दिवसांवर आला आहे.

मुंबईत कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के

मुंबईत २ ते ८ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबई चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एक प्रतिबंधित क्षेत्राची नोंद झाली आहे. ४९ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ४८ हजार ७१२ तर आतापर्यंत एकूण ९५ लाख २५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णाच्या सहवासातील ३ हजार ६५ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.