Join us  

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील चौथ्या यादीत ४६ हजार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 12:48 AM

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील चौथ्या यादीत ४६ हजार १२४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ७ आणि ८ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील चौथ्या यादीत ४६ हजार १२४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ७ आणि ८ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची असून ९ आॅगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार, ६ आॅगस्टला सायंकाळी पाच वाजता यादी जाहीर होणार होती. पण पहिल्या यादीत गोंधळ झाल्याने दुसºया यादीपासून एक दिवस आधीच यादी जाहीर करण्याची परंपरा उपसंचालक कार्यालयाने कायम ठेवली. सायंकाळी साडेसात वाजता यादी जाहीर केली. चौथ्या यादीसाठी ५५ हजार ५०९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४६ हजार १२४ विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत, त्यांच्यासाठी या यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यावर यादी जाहीर करण्यात येणार आहे.