निष्काळजीपणामुळे ४७ कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:45 AM2018-06-02T04:45:11+5:302018-06-02T04:45:11+5:30
अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे महापालिकेचे तब्ब्ल ४० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याची बाब समोर आली आहे
मुंबई : अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे महापालिकेचे तब्ब्ल ४० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याची बाब समोर आली आहे. महालक्ष्मी येथील कचरा हस्तांतरण केंद्रातून कचराभूमीपर्यंत कचरा वाहून नेण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीने महापालिकेवर सात कोटी रुपयांचा दावा केला होता. ही रक्कम वेळीच न दिल्याने दाव्याची रक्कम तब्ब्ल ४७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. या प्रकरणात पालिका अधिकाºयांनी वेळीच लक्ष न घातल्याने हे नुकसान सहन करावे लागणार असल्याचा आरोप करत भाजपाने चौकशीची मागणी केली आहे.
शहर भागातून गोळा करण्यात येणाºया ६५० मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी २००७मध्ये महालक्ष्मी हायड्रॉलिक आॅपरेटेड मॅकेनाईजड कचरा हस्तांतरण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या कंत्राटाचा कालावधी ८ मे २०१७ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे महालक्ष्मी येथे नवीन हायड्रॉलिक आॅपरेटेड मॅकेनाईजड कचरा हस्तांतरण केंद्र बसविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र दररोज शहर भागातून गोळा करण्यात येणाºया ६५० मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महापालिकेपुढे उभे राहिले.
मुलुंड, देवनार, कांजूर येथील कचराभूमीवर कचरा वाहून नेण्याचे काम ठेकेदाराला देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार कविराज एमबीबी वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जुन्या ठेकेदाराने या कामासंदर्भात सात कोटींचा दावा पालिकेवर केला आहे. या दाव्यावर वेळीच निर्णय न झाल्याने दाव्याची रक्कम आता ४७ कोटींवर पोहोचली आहे. तर जुन्या ठेकेदाराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समिती बैठकीत केली.