राज्यात ४७ हजार ९१९ रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:06 AM2021-09-19T04:06:56+5:302021-09-19T04:06:56+5:30
मुंबई : राज्यात शनिवारी ३,३९१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात ...
मुंबई : राज्यात शनिवारी ३,३९१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात ४७,९१९ रुग्ण उपचाराधीन आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दिवसभरात ३,८४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६३,२८,५६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के एवढे झाले आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६८,७४,४९१ नमुन्यांपैकी ११.४६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,८३,४४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,८१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१८,५०२ झाली असून मृतांचा आकडा १ लाख ३८ हजार ४६९ इतका आहे.