Join us

राज्यात दिवसभरात ४७ हजार रुग्ण, १५५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यात सोमवारी ४७ हजार २८८ रुग्ण आणि १५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रविवारच्या तुलनेत दैनंदिन कोरोना ...

मुंबई : राज्यात सोमवारी ४७ हजार २८८ रुग्ण आणि १५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रविवारच्या तुलनेत दैनंदिन कोरोना रुग्णांच्या निदानात घट झाली आहे. रविवारी ५७ हजार ७४ नवे रुग्ण सापडले होते. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३० लाख १० हजार ५९७ झाली असून, मृतांचा आकडा ५५ हजार ८७८ झाला आहे. सध्या राज्यात ४ लाख ५१ हजार ३७५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दिवसभरात २६ हजार २५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण २५ लाख ४९ हजार ७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३६ टक्के आहे, तर राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७ लाख १५ हजार ७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.७६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २४ लाख १६ हजार ९८१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, २० हजार ११५ संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

सोमवारी नोंद झालेल्या १५५ मृत्यूंपैकी ९० मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ३९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या १५५ मृत्यूंमध्ये मुंबई २१, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा १, रायगड ३, पनवेल मनपा ४, नाशिक ६, नाशिक मनपा ५, मालेगाव मनपा २, अहमदनगर मनपा २, अहमदनगर मनपा १, धुळे मनपा १, जळगाव २, नंदुरबार ४, पुणे ३, पुणे मनपा ३, सोलापूर ३, सोलापूर मनपा ३, सातारा २, सिंधुदुर्ग १, औरंगाबाद मनपा १, जालना १२, हिंगोली ३, परभणी १, लातूर ३, लातूर मनपा ६, बीड ३, नांदेड ९, नांदेड मनपा १४, अकोला मनपा २, अमरावती ५, यवतमाळ २, नागपूर १, नागपूर मनपा ९, वर्धा ५, चंद्रपूर ३ आदी रुग्णांचा समावेश आहे.