Join us

४७३ डिम्ड कन्व्हेअन्सचे जिल्ह्यातील प्रस्ताव मार्गी

By admin | Published: April 10, 2016 1:21 AM

ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाचे (डीम्ड कन्व्हेअन्स) ५४८ प्रकरणे वर्षभरात दाखल झाली होती. त्यापैकी ४७३ सोसायट्यांच्या प्रकरणांची सुनावणी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाचे (डीम्ड कन्व्हेअन्स) ५४८ प्रकरणे वर्षभरात दाखल झाली होती. त्यापैकी ४७३ सोसायट्यांच्या प्रकरणांची सुनावणी होऊन ती निकाली काढण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सुर्यवंशी यांनी दिली.जिल्हा मानीव अभिहस्तांतरण समन्वय समितीची बैठक सोमवारी सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा उपनिबंधक विभागाने हाऊसिंग सोसायट्यांच्या डीम्ड कन्व्हेअन्स प्रस्तावासंबंधी आढावा सादर केला. तर निकाली काढलेल्या प्रस्तावासह निर्णय प्रक्रियेत ७५ प्रस्ताव शिल्लक असल्याची माहिती यावेळी उघड झाली. शहरी व ग्रामीण भागातील मुद्रांक शुल्क वसुलीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. मुद्रांक शुल्काचे ठाणे शहरातून ६९६ प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी ६२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. उर्वरित ७१ प्रकरणे शिल्लक आहेत. तर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून २८५ प्रस्तावित झाले असता २१५ प्रस्ताव निकाली काढण्यात आले असून उर्वरित ७० प्रकरणे शिल्लक आल्याची माहिती या बैठकीत उघड झाले आहे. शहरी व ग्रामीण भागातील मुद्रांक शुल्काचे ८४० प्रकरणे वर्षभरात निकाली काढण्यात आली आहेत. या आढावा बैठकीस जिल्हा उपनिबंधक दिलीप उडाण, सहजिल्हा निबंधक र. य. भोये, दि. एल. गंगावणे, नगरभूमापन अधिकारी रोहिणी सागरे आदी अधिकारी उपस्थित होते.