मुंबई - मुंबईत रविवारी ४७९ रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ४८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४१ हजार २४० वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा १६ हजार ८४ वर पोहोचला आहे. सध्या ४ हजार ६६७ रुग्ण उपचाराधीन आहेत.
शहर उपनगरात रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ७ लाख १८ हजार २ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. मुंबईत १९ ते २५ सप्टेंबरपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.०६% टक्के आहे. शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार २०८ दिवसांवर येऊन ठेपला आहे.
मुंबई चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. रुग्ण आढळून आल्याने ५१ इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३९ हजार १९८, तर आतापर्यंत एकूण १ कोटी २ लाख १६ हजार ९७२ चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.