मुंबई : परंपरा जपत खेतवाडी चौथी गल्ली येथील मंडळाने ईको-फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. खेतवाडीची मंडळे ही उंच गणेशमूर्ती आणि देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पण, या मंडळाने मूर्तीची उंची न वाढवता आपले वेगळेपण जपले आहे.खेतवाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ४७वे वर्ष आहे. १९७१ साली या मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून हे मंडळ कटाक्षाने शाडूच्या मातीची मूर्ती आणते. या मंडळाच्या मूर्तीची उंची ही सव्वा पाच ते सहा फूट इतकीच असते. दरवर्षी गणेशोत्सवात देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देतात. यंदा ‘सर्वधर्म समभाव’ हा संदेश देखाव्यातून देत आहेत. साईबाबांच्या कथेतून हा संदेश दिला आहे. साईबाबा सर्वांचे अन्न एकत्र शिजवून सर्वांना एकत्र पंगतीत वाढत असत. या देखाव्यातून सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे. मंडळातर्फे वर्षभर गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते, अशी माहिती मंडळाचे चिटणीस प्रसाद करंजवकर यांनी दिली.गणेशोत्सवात एकीकडे सुंदर मूर्ती, देखावे भाविकांची मने मोहून घेत आहेत. तर, त्याचवेळी लालबाग, परळ आणि दादर विभागात फिरणाºया भाविकांना सामाजिक संदेश आॅडिओच्या माध्यमातून दिला जात आहे. मराठी शाळा संवर्धनासाठी गणेशोत्सव मंडळांत जनजागृती केली जात आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, मुंबईचा राजा, काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रंगारी बदक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मध्य प्रभादेवी सार्वजनिक उत्सव मंडळ - प्रभादेवी, प्रभादेवीचा राजा, सूर्यमहाल गणेशोत्सव मंडळ, दादरचा राजा या मंडळांनी मराठी शाळा संवर्धनासाठी सहकार्य करायचे ठरवले आहे. या मंडळांमध्ये आॅडिओ क्लीप लावल्या जाणार आहेत. या आॅडिओच्या माध्यमातून मराठी शाळा, मराठी माध्यमाचे फायदे, विद्यार्थ्यांना मिळणाºया शिक्षणाचे फायदे याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच भित्तीपत्रके लावली जाणार आहेत. यामध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमातील फरक आणि महत्त्व याविषयी माहिती दिली आहे.
खेतवाडीचा ईको-फ्रेण्डली बाप्पा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ४७वे वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 3:30 AM