डहाणू तालुक्यात ४८ अर्ज

By admin | Published: January 12, 2015 10:27 PM2015-01-12T22:27:19+5:302015-01-12T22:27:19+5:30

बोर्डी आणि वाणगाव गटातून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.

48 application in Dahanu taluka | डहाणू तालुक्यात ४८ अर्ज

डहाणू तालुक्यात ४८ अर्ज

Next

डहाणू : २८ जानेवारीला पालघर जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद तसेच डहाणू पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी उमेदवारीअर्ज दाखल करण्याच्या दिवसअखेर जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी १९ तर पंचायत समितीच्या निवडणुकांच्या २० गणांसाठी २९ अर्ज दाखल करण्यात आले. यात बोर्डी आणि वाणगाव गटातून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. तर पंचायत समितीच्या अस्वाली, विवलवेढे, डेहणे आणि चिंचणी गणांतूनही एकही अर्ज आलेला नाही.
आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार आणि कार्यकर्त्यांत उत्साह नसला तरी मंगळवारी उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळपासून नामांकनपत्र भरण्यासाठी येथील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मार्क्स. कम्यु., बहुजन विकास आघाडी तसेच अपक्ष आणि मनसे कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. विशेष म्हणजे जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी बहुसंख्य उमेदवार महिला नसल्याने सर्वच राजकीय पक्षांची मोठी अडचण झाली आहे.
(वार्ताहर)

Web Title: 48 application in Dahanu taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.