Join us

राज्यात दिवसभरात ४८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:08 AM

मुंबई : राज्यात दिवसभरात ३,६०८ रुग्ण आणि ४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर सध्या ३९,९४८ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात ...

मुंबई : राज्यात दिवसभरात ३,६०८ रुग्ण आणि ४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर सध्या ३९,९४८ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात ४,२८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत एकूण ६३ लाख ४९ हजार २९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७४ लाख ७६ हजार १४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.३६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ६४ हजार ४१६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ६७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात रुग्ण बरे हण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के असून मृत्यूदर २.१२ टक्के आहे. राज्यात मुंबईत ५ हजार ८३, ठाण्यात ५ हजार ५०७, पुण्यात ११ हजार ३४४, अहमदनगरमध्ये ५ हजार १०० सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ३१ हजार २३७ झाली असून मृतांचा आकडा १ लाख ३८ हजार ६६४ इतका आहे.