Join us

शिवसेना सुनावणीतील ४८ प्रश्न सारखेच, वेळकाढूपणा सुरू; ठाकरे गटाच्या वकीलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 8:15 PM

शिवसेनेतील आमदार अपात्रतेवरील सुनावणीला काल मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.

मुंबई- शिवसेनेतील आमदार अपात्रतेवरील सुनावणीला काल मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. आज बुधवारीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. आज दिवसभर ही सुनावणी चालली, दरम्यान, आजच्या सुनावणीत काय घडलं याची माहिती ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी दिली. या सुनावणीत ४८ प्रश्न सारखेच विचारले असून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप वकील सरोदे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीसांना बागेश्वर बाबा महत्त्वाचे वाटले असतील; बच्चू कडूंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

काल दिवसभर ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभु यांचा जबाब घेतला. आजही सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत काय घडलं याची माहिती देताना वकील असीम सरोदे म्हणाले, जो व्हीप महत्वाचा आहे, त्याच पालन केलं नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य आमदार अपात्र ठरु शकतात. तो व्हीप काढलाच नाही, तो व्हीप कोणाला माहित नाही याचा खोटा बनाव करण्यात आला. पण कितीही चालाख पद्धती केली तरीही परिस्थिती बदलता येत नाही. याची सर्व चर्चा सुप्रीम कोर्टात झाली आहे. त्यामुळे त्या व्हीपच अस्तित्व मान्य केलेलं आहे. आता अस्तित्व नाकारुन काही फायदा नाही. आज त्या व्हिपचं अस्तित्व नाकारण्यासाठी जवळपास ५८ प्रश्न विचारले गेले आणि तो वेळकाढूपणा सुरू असल्याचं मला वाटतं, असंही वकील असीम सरोदे म्हणाले. 

  " एकच प्रश्न फिरवून फिरवून विचारले जात आहेत. व्हीपबाबक एकच प्रश्न ४८ वेळा विचारला आहे. त्यामुळे हा सुनावणीतील वेळकाढूपणा सुरू आहे, असा आरोपही वकील सरोदे यांनी केला. कायद्याची प्रक्रिया लांबवण्याचे काम सुरू आहे. उद्याही सुनिल प्रभु यांचाच जबाब चालणार आहे. प्रभु यांना किडणीचा त्रास आहे म्हणून परवा त्यांना अनुपस्थितीत राहण्याची परवानगी मागितली आहे, असंही वकील सरोदे म्हणाले. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे