४८ एसटी महिला कर्मचा-यांचे गर्भपात, ३ महिने पगारी रजा केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:27 AM2018-03-12T05:27:42+5:302018-03-12T05:27:42+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अनागोंदी कारभाराची किंमत महिला वाहक कर्मचाºयांना चुकवावी लागत आहे. एसटीच्या महिला कर्मचाºयांना ९ महिने प्रसूती रजा देण्यात येईल, असे महामंडळाने आॅगस्ट २०१७ मध्ये जाहीर केले.

48 ST women employees' abortion, 3 month salary leave only on paper | ४८ एसटी महिला कर्मचा-यांचे गर्भपात, ३ महिने पगारी रजा केवळ कागदावरच

४८ एसटी महिला कर्मचा-यांचे गर्भपात, ३ महिने पगारी रजा केवळ कागदावरच

Next

- महेश चेमटे
मुंबई   - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अनागोंदी कारभाराची किंमत महिला वाहक कर्मचाºयांना चुकवावी लागत आहे. एसटीच्या महिला कर्मचाºयांना ९ महिने प्रसूती रजा देण्यात येईल, असे महामंडळाने आॅगस्ट २०१७ मध्ये जाहीर केले. मात्र या संदर्भात लेखी आदेश नसल्याने वाहक महिला कर्मचाºयांना आगार व्यवस्थापकांकडून रजा नाकारण्यात आल्या. परिणामी आतापर्यंत ४८ महिला वाहकांचे गर्भपात झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
आंतरराष्ट्रीय परिवहन कर्मचारी महासंघ आणि विविध महिला संघटनांतर्फे २०१६-१७ मध्ये एसटी महिला कर्मचाºयांचा सर्व्हे करण्यात आला होता. महामंडळातील कर्मचाºयांनी नाव आणि कामाचे ठिकाण न सांगण्याच्या अटीवर सर्वेक्षणात मते नोंदवली. राज्यातील ४ हजार ५०० महिला कामगारांपैकी १ हजार ५०० महिलांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता. पैकी ४०३ प्रश्नावलीचे प्रातिनिधिक विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला. सर्वेक्षणानुसार राज्यभरात वाहक पदावर कार्यरत असताना ४८ (६२ टक्के) महिला कर्मचाºयांचे गर्भपात झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांना बैठे काम देण्याच्या सूचना असताना वाहकाची ड्यूटी दिल्यामुळे शारीरिक त्रास झाल्याची कबुली ७८ (५७ टक्के) महिला कर्मचाºयांनी दिली.
एसटी महामंडळात १ लाख २ हजार अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी महिला कर्मचाºयांची संख्या ४ हजार ५०० इतकी आहे. एसटी महामंडळाने २१ आॅगस्ट २०१७ रोजी ‘एसटीच्या महिला कर्मचाºयांना ९ महिने प्रसूती रजा मिळणार’ असे परिपत्रक काढले होते. सात महिन्यांच्या कालावधीनंतर याबाबत लेखी आदेश नसल्यामुळे महिला कर्मचाºयांचे गर्भपात होत असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्याचबरोबर आगार व्यवस्थापक आणि वाहक महिला कर्मचारी यांच्यात वाद उद्भवत असल्याची माहिती समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय परिवहन कर्मचारी महासंघ
१५० देशांतील ७०० संघटनांचे नेतृत्व करणारी ही संस्था आहे. कर्मचाºयांची सुरक्षितता आणि कर्मचाºयांच्या विविध समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा महासंघ कार्यरत आहे.

बोर्डाच्या बैठकीनंतर परिपत्रक निघेल
एसटी महिला कर्मचाºयाला प्रसूतीविषयक ३ महिने भर पगारी रजा देण्याचा निर्णय झाला आहे. महामंडळाची बोर्डाची बैठक आणि तांत्रिक कारणामुळे परिपत्रकाला विलंब झाला. बोर्डाच्या बैठकीनंतर लवकरच या निर्णयाचे परिपत्रक काढण्यात येईल. सर्वेक्षणातील आकडेवारी ही बनावट आहे. केवळ विशिष्ट महिलांचा सर्व्हे करून महिला संघटना अशी आकडेवारी प्रसिद्ध करून एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
- रणजित सिंह देओल, एसटी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

Web Title: 48 ST women employees' abortion, 3 month salary leave only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.