Join us

राज्यात काेराेनाचे ४८ हजार ४०६ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मंगळवारी ४ हजार ५१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत एकूण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मंगळवारी ४ हजार ५१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत एकूण १८ लाख ९४ हजार ८३९ रुग्ण काेराेनामुक्त झाले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के झाले असून सध्या ४८ हजार ४०६ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात २ लाख १८ हजार ५८ व्यक्ती घरगुती विलगीकरणात आहेत. तर मागील काही दिवसांच्या तुलनेत आता संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या दोन हजारांच्या खाली आहे. त्यामुळे मागील कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे.

राज्यात मंगळवारी दिवसभरात २ हजार २९४ रुग्ण आणि ५० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, बाधितांची एकूण संख्या १९ लाख ९४ हजार ९७७ झाली असून मृत्यूंचा एकूण आकडा ५० हजार ५२३ आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३८ लाख ९५ हजार २७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.३६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

...........................