Join us

पाच महिन्यांपासून ४८० अग्निशमन जवानांना पगार नाही

By जयंत होवाळ | Published: May 21, 2024 9:09 PM

नियुक्तीचे कागदपत्र प्रमाणित करा, कामगार सेनेची मागणी.

मुंबई : प्रशासकीय प्रक्रियेमुळे सरळसेवेने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असून, अग्निशमन दलातील ४८० अग्निशामकांना जानेवारी २०२४ पासूनचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नियुक्ती देणाऱ्या खात्याने कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे कागदपत्र प्रमाणित करून त्यांना द्यावेत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पालिकेत सरळसेवा भरतीने नियुक्त्या केल्या जातात. त्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती देणारे खाते केवळ नियुक्तीचे आदेश देतात. त्यानंतर नियुक्ती आदेश घेऊन कर्मचारी संबंधित विभागात रुजू होतो. या कर्मचाऱ्यांना सेवेत एक महिना पूर्ण झाल्यावर त्यांचे वेतन काढताना त्यांच्या संपूर्ण कागदपत्रांचे नव्याने आर. एल. ऑडिट - रजा पडताळणी होते. या प्रक्रियेत खूप वेळ जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना महिनोंमहिने वेतन मिळत नाही. या वेळखाऊ प्रक्रियेचा २३ जानेवारी २०२४ रोजी रुजू झालेल्या अग्निशमन दलातील ४८० अग्निशामकांसह विशिष्ट कोट्यातून भरती झालेल्या दिव्यांगांनाही फटका बसला आहे. याकडे युनियनने लक्ष वेधले आहे.

टॅग्स :मुंबई