परदेशात नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची फसवणूक, ४८२ पासपोर्ट हस्तगत, गुन्हे शाखेची कारवाई

By मनीषा म्हात्रे | Published: December 13, 2023 08:24 PM2023-12-13T20:24:17+5:302023-12-13T20:24:46+5:30

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी `बॉम्बे इंटरनॅशनल कन्सलटन्सी व इंडियन ओव्हरसीज या नावाने प्लेसमेंट एजन्सी कार्यालय उघडून भारतातील विविध राज्यातील तरुणांना अझरबैझन, ओमान, दुबई, सौदी अरेबीया, कतार व रशिया या परदेशात नोकरीचे आमिष दाखवले.

482 Passports Seized, Crime Branch Acts on Cheating of Youth by Lure of Job Abroad | परदेशात नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची फसवणूक, ४८२ पासपोर्ट हस्तगत, गुन्हे शाखेची कारवाई

परदेशात नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची फसवणूक, ४८२ पासपोर्ट हस्तगत, गुन्हे शाखेची कारवाई

 

मुंबई : परदेशात नोकरीचे आमिष दाखवत बनावट व्हिझाद्वारे भारतातील बेरोजगार तरूणांची फसवणूक करणा-या आंतरराजीय टोळीतील मुख्य आरोपींना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून ४८२ पासपोर्ट हस्तगत करण्यात आले आहे.  पतित पबन पुलीन हालदर (३६), मोहम्मद ईलीयास अब्दुल सत्तार शेख मन्सुरी (४९) अशी अटक आरोपींची नावे आहे. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरु आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी `बॉम्बे इंटरनॅशनल कन्सलटन्सी व इंडियन ओव्हरसीज या नावाने प्लेसमेंट एजन्सी कार्यालय उघडून भारतातील विविध राज्यातील तरुणांना अझरबैझन, ओमान, दुबई, सौदी अरेबीया, कतार व रशिया या परदेशात नोकरीचे आमिष दाखवले. परदेशातील वेगवेगळ्या नामांकित कंपनीत नोकरीच्या नावाखाली तरुणाचे पासपोर्ट मुंबईतील वेगवेगळ्या कार्यालयात जमा करून घेतले. त्यानंतर तरुणांना नामांकित कंपन्यांचे बनावट ऑफर लेटर व संबंधित देशांचा बनावट वर्क व्हिझा व्हॉट्स अॅपव्दारे पाठऊन विश्वास संपादन केला.  त्यामोबदल्यात तरुणांकडून प्रत्येकी ४० ते ६० हजार रूपये वेगवेगळया बँक खात्यावर स्विकारले. अशाप्रकारे आरोपीनी अनेक तरूणांकडून पैसे उकळले.  मात्र त्याला नोकरी दिली नाही शिवाय त्यांचे पासपोर्टही स्वतःकडे ठेवून त्यांची  फसवणूक केली.

        ठग मंडळी  कार्यालय बंद करून पसार होताच, तरुणांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरु केला. गुन्हे शाखेने पाच पथके स्थापन पाच आरोपीना यापूर्वी दिल्ली, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातून अटक केली होती.  

१) बळीत व्यक्तींचे एकूण ६२ पासपोर्ट, (२) अझरबैझन देशाचे एकूण ०७ बनावट व्हिझा, स्टिकर्स व कागदपत्रे, २) ५ संगणक व संगणकीय साहीत्य - कलर प्रिंटर, (३) ०५ लॅन्डलाईन फोन व ०७ मोबाईल फोन इंटरनेट कनेक्शन राउटर, (४) विविध कंपन्याचे १४ मोबाइल सीम कार्ड, (५) ०३ विविध रबरी शिक्के, ८) विविध बँकांचे १० डेबीट कार्ड, ०६ चेकबुक व पासबुक असे गुन्हयात वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत करण्यात आले होते.

     या कारवाईपाठोपाठ गुन्हे शाखेने या टोळीच्या मुख्य दोन आरोपीना पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. आरोपीकडून फसवणूक झालेल्या तरुणांचे  ४८२ मूळ पासपोर्ट जप्त करण्प्यात आले आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात ७ आरोपीना अटक करून एकूण ५४४ पासपोर्ट हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले.

Web Title: 482 Passports Seized, Crime Branch Acts on Cheating of Youth by Lure of Job Abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.