मुंबईत काेरोनाच्या ४८५ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:06 AM2021-09-19T04:06:54+5:302021-09-19T04:06:54+5:30
मुंबई : मुंबईत शनिवारी ४८५ रुग्णांची नोंद झाली असून ६ मृत्यूची नोंद झाली आहे. ४३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला ...
मुंबई : मुंबईत शनिवारी ४८५ रुग्णांची नोंद झाली असून ६ मृत्यूची नोंद झाली आहे. ४३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ३७ हजार ६८५ वर पोहोचला आहे, मृतांचा आकडा १६ हजार ४८ वर पोहोचला आहे. शहर उपनगरात रुग्ण बरे होण्याची संख्या ७ लाख १४ हजार ४२४ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
मुंबईत ११ ते १७ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ % टक्के असल्याची नोंद आहे. शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार २७६ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही, ४२ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ४१ हजार २४ तर आतापर्यंत एकूण ९९ लाख २५ हजार ९५५ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
३६२ गंभीर रुग्ण
शहर उपनगरातील सक्रिय रुग्णांपैकी ३६२ रुग्णांची प्रकृती पालिकेच्या डॅशबोर्डवर नमूद आहे. तर २ हजार ९६ रुग्ण लक्षणविरहित आहेत, २ हजार २०० रुग्णांमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे आहेत.