Join us

राज्यात ४९,०६७ रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:16 AM

मुंबई : राज्यात २,८२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत एकूण १८,५०,१८९ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात ...

मुंबई : राज्यात २,८२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत एकूण १८,५०,१८९ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८७ टक्के झाले आहे. राज्यात ४९ हजार ६७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात मंगळवारी ३,१६० नवीन रुग्ण व ६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ५० हजार १७१ झाली असून, मृतांचा आकडा ४९ हजार ७५९ इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.५५% एवढा आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ६४ मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या ६४ मृत्यूंमध्ये मुंबई ९, ठाणे १, ठाणे मनपा २, उल्हासनगर मनपा २, पालघर १, वसई विरार मनपा १, रायगड १, पनवेल मनपा ५, नाशिक २, नाशिक मनपा ३, अहमदनगर ३, जळगाव १, जळगाव मनपा १, पुणे ३, पुणे मनपा ४, सातारा ३, सिंधुदुर्ग १, बीड ३, अकोला १, अकोला मनपा २, अमरावती १, यवतमाळ ५, बुलडाणा १, नागपूर मनपा ३, भंडारा १, चंद्रपूर २, चंद्रपूर मनपा २ या रुग्णांचा समावेश आहे.