मुंबई - मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. तरी साडे पाच वर्षात मुंबईत तब्बल 49179 आपत्कालीन दुर्घटनेत 987 लोकांची बळी 3066 जख्मी झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस बृहन्मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापन विभागाला 2013 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहे तसेच दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किती जखमी झाले आहे याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम-2005 अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन 2013 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण 49179 आपत्कालीन दुर्घटनेत झाल्या आहे. व एकूण 987 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 3066 लोक दुर्घटनेत जखमी झाले आहे. 2013 मध्ये एकूण 7229 आपत्कालीन दुर्घटनना झाल्या आहेत. व एकूण 215 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 149 पुरुष आणि 66 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 1636 लोक जखमी झाले असून त्यात 436 पुरुष आणि 200 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2014 मध्ये एकूण 7241 आपत्कालीन दुर्घटनना झाल्या आहेत. व एकूण 140 लोकांची मृत्यू झाला असून त्यात 120 पुरुष आणि 20 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 331 लोक जखमी झाले असून त्यात 331 पुरुष आणि 159 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2015 मध्ये एकूण 7418 आपत्कालीन दुर्घटनना झाल्या आहेत. व एकूण 147 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 110 पुरुष आणि 37 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 494 लोक जखमी झाले असून त्यात 307 पुरुष आणि 187 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2016 मध्ये एकूण 9037 आपत्कालीन दुर्घटनना झाल्या आहेत. तसेच एकूण 163 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 132 पुरुष आणि 31 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 541 लोक जखमी झाले असून त्यात 367 पुरुष आणि 174 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2017 मध्ये सर्वात जास्त एकूण 11524 आपत्कालीन दुर्घटनना झाल्या आहेत. व एकूण 226 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 105 पुरुष आणि 121 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 526 लोक जखमी झाले असून त्यात 359 पुरुष आणि 167 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2018 जुलै पर्यंत एकूण 6730 आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहेत. व एकूण 96 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 75 पुरुष आणि 21 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 379 लोक जखमी झाले असून त्यात 250 पुरुष आणि 129 स्त्रियांचे समावेश आहे.
आपत्कालीन दुर्घटनेत झाडे / झाडांच्या फांद्या पडणे / पडण्याच्या स्थितीत, दरड कोसळणे, घर / घरांचे भाग / भिंती / इमारती / इमारतींचे भाग कोसळणे / तडे जाणे, आग / शोर्टसर्किट, गैस गळती, रस्त्यावर आईल पडणे, समुद्रात / नाल्यात / नदीत / विहिरीत / खाडीत / खदानात / मैनहोलमध्ये पडणे, अपघात, पक्षी / प्राणी / मनुष्य अडकणेच्या समावेश आहे.
2013 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण 21452 झाडे / झाडांच्या फांद्या पडण्याची घटना झाली आहे. व एकूण 30 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 16 पुरुष आणि 14 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 256 लोक जखमी झाले असून त्यात 152 पुरुष आणि 104 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच एकूण 71 दरड कोसळणची घटना झाली आहे. व एकूण 7 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 6 पुरुष आणि 1 स्त्रीचा समावेश आहे. व एकूण 14 लोक जखमी झाले असून त्यात 13 पुरुष आणि 1 स्त्रीचा समावेश आहे. तसेच एकूण 2704 घर / घरांचे भाग / भिंती / इमारती / इमारतींचे भाग कोसळणची घटना झाली आहे. व एकूण 234 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 152 पुरुष आणि 82 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 840 लोक जखमी झाले असून त्यात 538 पुरुष आणि 302 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच एकूण 20074 आग / शोर्टसर्किटमुले घटना झाली आहे. व एकूण 208 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 139 पुरुष आणि 69 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 1077 लोक जखमी झाले असून त्यात 680 पुरुष आणि 397 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच एकूण 1291 गैस गळती मुळे घटना झाली आहे. व एकूण 7 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 3 पुरुष आणि 4 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 71 लोक जखमी झाले असून त्यात 46 पुरुष आणि 25 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच एकूण 1119 रस्त्यावर आईल पडण्यामुळे घटना झाली आहे. व एकूण 22 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 21 पुरुष आणि 4 स्त्रीचे समावेश आहे. व एकूण 292 लोक जखमी झाले असून त्यात 221 पुरुष आणि 71 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच एकूण 639 समुद्रात / नाल्यात / नदीत / विहिरीत / खाडीत / खदानात / मैनहोलमध्ये पडण्याची घटना झाली आहे. व एकूण 328 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 237 पुरुष आणि 91 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 167 लोक जखमी झाले असून त्यात 122 पुरुष आणि 45 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच एकूण 506 अपघाताची घटना झाली आहे. व एकूण 66 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 56 पुरुष आणि 10 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 291 लोक जखमी झाले असून त्यात 243 पुरुष आणि 48 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच एकूण 132 मनुष्य अडकणेची घटना झाली आहे. व एकूण 85 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 61 पुरुष आणि 24 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 58 लोक जखमी झाले असून त्यात 35 पुरुष आणि 23 स्त्रियांचे समावेश आहे.आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते सर्वात जास्त 328 लोकांचा मृत्यू समुद्रात / नाल्यात / नदीत / विहिरीत / खाडीत / खदानात / मैनहोलमध्ये पडून झाली आहे. त्यात 237 पुरुष आणि 91 स्त्रियांचे समावेश आहे. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी मुंबई मनपा आयुक्त अजॉय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदले यांस पत्र पाठवून आपत्कालीन दुर्घटनेत लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी विशेष व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.