लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या अकरा महिन्यांत केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मात्र, एक महिन्यानंतर रविवारी पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. रविवारी ६४५ रुग्ण आढळून आले होते. त्यात घट झाली असून सोमवारी मुंबईत कोरोनाचे ४९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख १४ हजार ५६९ वर पोहोचला, तर मृतांचा आकडा ११ हजार ४२० वर पोहोचला आहे. ५६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या २ लाख ९६ हजार ७६१ वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या ५ हजार ३३१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४५५ दिवस इतका आहे.
मुंबईत ६ जानेवारीला ७९५, ७ जानेवारीला ६६५, ८ जानेवारीला ६५४, १० जानेवारीला ६५६ कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज ३०० ते ५०० दरम्यान रुग्ण आढळून येत होते. रविवारी ६४५ रुग्ण आढळून आले होते.
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ७ नोव्हेंबरला ५७६, १० नोव्हेंबरला ५३५, १६ नोव्हेंबरला ४०९, १८ जानेवारीला ३९५, २४ जानेवारीला ३४८, २६ जानेवारीला ३४२, १ फेब्रुवारीला ३२८ म्हणजेच सर्वांत कमी रुग्ण आढळून आले.
................