तीन महिन्यांत सायबरचे ४९४ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 04:47 AM2020-06-22T04:47:20+5:302020-06-22T04:47:30+5:30

आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९५ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी २०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

494 cyber crimes registered in three months | तीन महिन्यांत सायबरचे ४९४ गुन्हे दाखल

तीन महिन्यांत सायबरचे ४९४ गुन्हे दाखल

Next

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबरसंदर्भात ४९४ गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी २६१ व्यक्तींना अटक केली आहे राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४९४ गुन्हे २० जूनपर्यंत झाले आहेत. त्यात आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९५ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी २०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
व्हिडीओ शेअरप्रकरणी २६ गुन्हे तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ९ गुन्हे दाखल झाले आहेत. इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे, तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी ५७ गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: 494 cyber crimes registered in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.