मुंबई : राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे रखडलेल्या एमबीए-एमएमएस सीईटीचा निकाल शनिवारी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. या निकालात ठाण्याचा शशांक चंद्रहास प्रभू हा विद्यार्थी १५९ गुण मिळवून (९९.९९ पर्सेन्टाइल) प्रथम आला आहे. तर मुंबईचा अंकित उदित ठक्कर आणि लखनौची आकांक्षा श्रीवास्तव अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या दहा क्रमांकामध्ये ५ उमेदवार मुंबईचे असून इतर उमेदवार अमरावती, औरंगाबाद, नाशिकचे ही आहेत. विशेष म्हणजे पहिल्या १६ विद्यार्थ्यांना ९९.९९ पर्सेन्टाइल आहेत.यंदा राज्यातील ३६ हजार ७६५जागांसाठी ही प्रवेश परीक्षा १४ व १५ मार्च रोजी घेण्यात आली होती. परीक्षेला राज्यभरातून एक लाख १० हजार ६३१ विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा एकूण १४८ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. त्यातील १३५ केंद्रे ही राज्यातील तर १३ केंद्रे ही राज्याबाहेरील होती. गेल्यावर्षी बोगस प्रवेश आढळल्याने यंदा 'एमबीए', 'एमएमएस' प्रवेशांसाठी अखिल भारतीय उमेदवारी प्रकारात राज्य सरकारची 'सीईटी', 'सीमॅट' आणि राष्ट्रीय स्तरावर होणारी 'कॅट' ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमासाठी इतर कोणतीही खासगी व्यवस्थापनाची प्रवेशपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही, असे सीईटी सेलने यापूर्वीच सष्ट केले आहे.सीईटीचे उतीर्ण विद्यार्थीप्राप्त गुण - विद्यार्थी संख्या१५१- १७५ ४१२६-१५० ३९२१०१-१२५ ९२४५१-१०० ५५००१००-५० ५१३१०००-५० ५१३१०