आंदोलनप्रकरणी मुंबईत ४ गुन्हे; पोस्टर झळकविणाऱ्या तरुणीविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:57 AM2020-01-08T05:57:16+5:302020-01-08T05:57:20+5:30

जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ गेट ऑफ इंडिया येथे आंदोलन करणा-या आंदोलकांसह, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 crimes in Mumbai over agitation case; A crime against a young woman posing as a poster | आंदोलनप्रकरणी मुंबईत ४ गुन्हे; पोस्टर झळकविणाऱ्या तरुणीविरुद्ध गुन्हा

आंदोलनप्रकरणी मुंबईत ४ गुन्हे; पोस्टर झळकविणाऱ्या तरुणीविरुद्ध गुन्हा

Next

मुंबई : जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ गेट ऑफ इंडिया येथे आंदोलन करणा-या आंदोलकांसह, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत एकूण ४ गुन्हे दाखल असून, यात आंदोलनादरम्यान ‘फ्री काश्मीर’चा झेंडा फडकाविणाºया मेहक मिर्झा प्रभू या तरुणीविरुद्ध १५३ बी अन्वये कुलाबा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंदोलनानंतर मुंबईतील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
तसेच गेट वे आॅफ इंडिया येथील आंदोलकांपैकी सुवर्णा साळवे, फिरोज मिठीबोरवाला, विद्यार्थी नेता उमर खालीदसह अन्य साथीदारांविरुद्ध बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात, तर हुतात्मा चौकात परवानगी न घेता आंदोलन छेडल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांविरुद्ध एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच गेट वे येथून हुतात्मा चौकापर्यंत मोर्चा काढल्याप्रकरणी साळवे, मिठीबोरवाला, उमर खालीद यांच्यासह ३१ जणांविरुद्ध एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत. आंदोलकांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नये याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: 5 crimes in Mumbai over agitation case; A crime against a young woman posing as a poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.