Join us

मुंबई-नाशिक महामार्गावरील कामचुकार ठेकेदार कंपनीला 5 कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 1:29 PM

इगतपुरी तालुक्यातील गोंदे ते भिवंडी तालुक्यातील वडपे दरम्यान महामार्गाच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी पिक इंन्फ्रा कंपनीला देण्यात आली आहे.

शाम धुमाळ 

मुंबई - नाशिक महामार्ग क्र. ३ या राष्ट्रीय महामार्गचे काम सुरवातीला ग्यामन इंडिया या कंपनी ने पूर्ण केले त्या नंतर महामार्गची देखभाल, दुरुस्ती, व टोल वसुली चे कंत्राट   पिक इन्फ्रा या कपंनी ला देण्यात आले या कंपनीला संपूर्ण रस्त्याची देखभालीसह दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र गेल्या काही काळात संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झालेली असून कसारा घाटात दोन वर्षापुर्वी दरड कोसळल्यानंतर देखील दुरुस्तीचे काम पूर्ण झालेली नाही. ज्याठिकाणी काम झाले आहे त्याचा संपूर्ण कामाचा  दर्जा ढासळला असल्याचे समोर आले . त्यामुळे संबंधित पिक इंन्फ्रा कंपनी प्रशासनाला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने तब्बल ४ कोटी ७३ लाख ४७ हजार ७७० रुपयांचा दंड सुनावला आहे.

इगतपुरी तालुक्यातील गोंदे ते भिवंडी तालुक्यातील वडपे दरम्यान महामार्गाच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी पिक इंन्फ्रा कंपनीला देण्यात आली आहे. संबंधित कंपनीतर्फे घोटी व पडघा येथे टोलनाका उभा करुन वाहनधारकांकडून टोल शुल्क वसूल केले जाते.तर कसारा बायपास येथे आलिशान हॉटेल वजा कार्यालय आहे, महामार्गची दुरावस्था  झाली तर या कंपनीकडून सदर रस्त्याची देखभाल करणे बंधनकारक असताना पिक इन्फ्रा कंपनी कडून या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अनेक आपघात झालें व निष्पाप जीव गेले . इगतपुरी, शहापूर, तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. संततधार चालणाऱ्या पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळणेसह रस्ता वाहून जाण्याच्या घटना नियमित घडत असतात. पावसाळा संपल्यानंतर सदर दुरावस्था झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे कंपनी प्रशासनाला बंधनकारक असते. मात्र पावसाळा संपूनही सदर रस्त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. कसारा घाटात वारंवार दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असतांना सदर दरडी ना रोल प्रेसिंग (रोलिंग प्रेस )च्या जाळ्या बसवण्याच्या सूचना रोड रिसर्च सेंटर दिल्ली यांनी सूचना करून देखील कंपनी ने सर्व सूचना ना पायदळी तुडवल्या राष्ट्रीय महामार्ग  प्रशासनाशी चर्चा करुन सदर रस्ता दुरुस्तीबाबत कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून  सूचना देण्यात आल्या होत्या.व ठराविक मुदत देऊन दुरुस्ती चे आदेश देण्यात आले होते, व  ठरवून दिलेल्या मुदतीत कंपीनेने काम पूर्ण न केल्यास दंड सुनाविण्याचे निश्चित झाले होते. मात्र सदर  पिक इन्फ्रा कंपनीला प्रशासनाने तीनवेळा नोटीस देवून देखील मुदतीत सदर रस्त्याची दुरुस्ती केली  नाही. याशिवाय घाट रस्ता भागात दरड कोसळणाऱ्या संभाव्य भागात जाळी मारण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने संबंधित पीक इन्फ्रां कंपनीला पावणे पाच कोटींचा दंड सुनावला आहे. यामुळे शहर व परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. 

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दंड सुनावला असल्याने वाहनधारकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. संबंधित कंपनी प्रशासनाने आतातरी सदर रस्त्याच्या दर्जा सुधारावा, अशी अपेक्षा वाहनधारकांनी केली आहे. या दंडाची रक्कम तीनविभागात विभागाण्यात आली आहे. यात पहिल्या भागात ३ कोटी १९ लाख ८८ हजार ७९९ अशी तर दुसऱ्या विभागात रस्ता पूर्नरबांधणीसाठी ६३ लाख ३१ हजार २१४ रुपयांचा दंड असून तिसऱ्या विभागात रस्ता वाढीव लांबीसाठीसह नुतनीकरणाला ९० लाख २७ हजार ७५७ रुपयांचा दंड असा एकूण ४ कोटी ७३ लाख ४७ हजार ७७० रुपयांचा  दंड इन्फ्रां कंपनीला दंड सुनाविण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने विहित मुदतीत दंड भरणा करण्याचे सुनाविले असून मुदतीनंतर दंडाची रक्कम भरल्यास त्यावर दंड आकारण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे. 

प्रोजेक्ट मॅनेजर अन्य कामात व्यस्त.दरम्यान राष्ट्रीय महामार्ग असल्याने या महामार्गाच्या दुरुस्ती कडे वाहनचालक वाहतूकदार प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पिक इन्फ्रा चे स्थानिक प्रोजेक्ट मॅनेजर राकेश ठाकूर यांनी गांभीर्याने बघणे  गरजेचे असताना त्यांनी या कडे दुर्लक्ष करीत कामचुकार पणा करणार्यांना अभय दिले मात्र कपंनी चे स्क्रॅब मटेरियल लिलाव असो किंवा   अन्य फायदेशीर बाबींकडे मात्र वेळेत लक्ष देत आल्याने महामार्ग चि दुरावस्था जैसे थे आहे दरम्यान वाहतूकदार,प्रवाशी, वाहनचलक यांच्या जीवाशी खेळणाऱ्या पिक इन्फ्रा कंपनी चा ठेका काडून घेण्यात यावा अथवा स्थानिक व्यवस्थापणच बदली करावे अशी मागणी आता पुढे येत आहे.

वाहनचालक, वाहतूक दार प्रवाशी यांच्या कर पैशा चा दुरुपयोग

दरम्यान मुंबई ते नाशिक प्रवास करताना वाहनचालक प्रवाशी टोल च्या माद्यमातून महामार्ग देखभाल साठी असलेल्या कपंनी ला कर स्वरूपात पैसे भरत असतात या टोल टॅक्सच्या बदल्यात पिक इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने वाहनचालकांना अपघात किंवा महामार्ग वर काही अडचणी आल्यास  त्या वेळी  क्रेन, टोचण, रुग्णवाहिका या सुविधा मोफत देणे बंधनकारक असताना रुग्णवाहिका वागळता अन्य कुठलीही सुविधा देण्यात येत नाही. मात्र रुग्णवाहिका सुविधा देखील 60 किलोमीटर साठी एकच  असल्याने ती वेळेवर पोहचत नाही. दरम्यान टोल टॅक्स चा पैशाचा उपयोग कार्यालयात येणाऱ्या vip लोकांना काजू बदाम खाऊ घालण्यात होत असल्याची चर्चा सद्या वाहनचालक करीत आहेत.

टॅग्स :रस्ते सुरक्षामुंबईमहामार्ग