Join us

मुंबईमध्ये एक वर्षात जप्त केला ५ कोटींचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 2:06 AM

अन्न व औषध प्रशासनाने एक वर्षामध्ये तब्बल ५ कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. १० ट्रक भरून असलेला हा गुटखा पुढील दोन दिवसांत नियमाप्रमाणे नष्ट केला जाणार आहे.

नवी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने एक वर्षामध्ये तब्बल ५ कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. १० ट्रक भरून असलेला हा गुटखा पुढील दोन दिवसांत नियमाप्रमाणे नष्ट केला जाणार आहे.राज्य शासनाने गुटखाबंदीचा निर्णय घेतल्यानंतरही सर्वत्र गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. मुंबईमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने वर्षभर विविध ठिकाणी धाडी टाकून गुटख्याचा साठा जप्त केला जातो. एप्रिल २०१७ पासून तब्बल ५ कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. हा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या गोडावूनमध्ये पडून आहे. सर्व शासकीय परवानग्या घेवून हा माल नष्ट करण्याची कारवाई केली जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे क्षेपणभूमीवर या मालाची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. पोलीस व इतर पंचांच्या समोर गुुटख्याच्या साठ्याचे वजन करून सर्व नोंदी करून ही प्रक्रिया पार केली जाणार आहे.मुंबईमधून ट्रकमध्ये गुटखा भरण्याचे काम सोमवारी सुरू झाले असून सायंकाळपर्यंत पाच ट्रक माल भरून नवी मुंबईकडे पाठविण्यात आला आहे. मंगळवारी उर्वरित पाच ट्रक माल पाठविण्यात येणार आहे. मंगळवार व बुधवार दोन दिवस तो नष्ट करण्याची कार्यवाही सुरू राहणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.