मुंबई : मुंबईचे कमाल तापमान बुधवारी ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असले तरी आर्द्रतेमधील चढ-उतार आणि ढगाळ हवामानाने मुंबईकरांना घाम फोडला. सोमवारी आणि मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान अनुक्रमे ३७, ३९ अंश नोंदविण्यात आले. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल तापमानात ५ अंशांनी घट झाली. त्यामुळे मुंबईकरांची उन्हापासून किंचित सुटका झाली. उकाडा कायम असल्याने मुंबईकरांची घामाने आंघोळ होत होती.पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हयांत एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ व सोसाटयाचा वारा वाहील. हलक्या पावसाची शक्यता आहे.उष्णतेची लाट
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी उष्ण रात्र असेल.आकाश ढगाळ
मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ व किमान तापमान २७ अंश राहील.कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये
चिखलठाणा ४०.५जालना ४०.४मालेगाव ४३.२डहाणू ३७.१सातारा ४०.१ठाणे ३५.६उदगीर ३९.६नाशिक ४०.६बारामती ४०.१जळगाव ४२.८कोल्हापूर ३६.७परभणी ४१.७मुंबई ३४.७नांदेड ४१.४पुणे ३९.८सोलापूर ४२.६धाराशीव ४०.६जेऊर ४३सांगली ३९.५बीड ४३.२