सोनसाखळी चोरीच्या दोन दिवसांत ५ घटना
By admin | Published: February 9, 2016 02:17 AM2016-02-09T02:17:03+5:302016-02-09T02:17:03+5:30
शहरातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांमध्ये सोनसाखळी चोरीच्या पाच घटना घडल्या. यामध्ये लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे. एरव्ही, दुचाकीवरून येणारे सोनसाखळी चोर आता रिक्षातूनही
ठाणे : शहरातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांमध्ये सोनसाखळी चोरीच्या पाच घटना घडल्या. यामध्ये लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे. एरव्ही, दुचाकीवरून येणारे सोनसाखळी चोर आता रिक्षातूनही येऊ लागल्याने नागरिकांसह पोलीसही चक्रावले आहेत.
नौपाड्यातील भांजेवाडी भागातील एक महिलेकडून ८२ हजारांच्या दोन सोनसाखळ्या हिसकावून पलायन केले. अन्य एका घटनेत डोंबिवलीची ४२ वर्षीय गृहिणी गळ्यातील ३८ हजारांचे मोठे आणि १० हजारांचे छोटे अशी ४८ हजारांची दोन मंगळसूत्रे हिसकावून पळ काढला. या दोन्ही प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वागळे इस्टेट येथे अरविंदसिंग बोपाराय यांची २५ हजारांची सोनसाखळी आणि रोकड हिसकावून पळ काढला. वर्तकनगर म्हाडा वसाहतीमध्ये ४५ वर्षीय व्यक्तीकडून १५ हजारांची सोनसाखळी हिसकावून पलायन केल्याचा प्रकार घडला. पाटीलवाडीसमोरील रोडवरून पत्नीसह घरी पायी जात असताना मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या गळ्यातील २० हजारांची सोनसाखळी हिसकावली (प्रतिनिधी)