मध्य रेल्वेवर ५ तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; पूल दुरुस्तीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 02:35 AM2017-11-03T02:35:06+5:302017-11-03T02:35:13+5:30

मध्य रेल्वेच्या ठाणे-मुलुंड स्थानकांदरम्यान कोपरी पुलाच्या दुरुस्तीसाठी रात्रकालीन ५ तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री पूल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे अप धिम्या मार्गावरील वाहतूक विक्रोळी स्थानकापर्यंत जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे.

5 hour traffic and power block on Central Railway; Bridge repair work | मध्य रेल्वेवर ५ तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; पूल दुरुस्तीचे काम

मध्य रेल्वेवर ५ तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; पूल दुरुस्तीचे काम

Next

मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे-मुलुंड स्थानकांदरम्यान कोपरी पुलाच्या दुरुस्तीसाठी रात्रकालीन ५ तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री पूल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे अप धिम्या मार्गावरील वाहतूक विक्रोळी स्थानकापर्यंत जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे.
ठाणे - मुलुंड स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. परिणामी, ब्लॉक कालावधीत अप धिम्या मार्गावरील वाहतूक विक्रोळी स्थानकापर्यंत अप जलद मार्गावर वळविण्यात येईल. यामुळे नाहुर आणि कांजूरमार्ग स्थानकांत लोकल उपलब्ध नसतील. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १०.०८ आणि ११.०४ची ठाणे लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच चालवण्यात येईल. रात्री उशिरा प्रवास करणाºया प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

Web Title: 5 hour traffic and power block on Central Railway; Bridge repair work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई