मुंबई विमानतळावर पाच किलो सोने हस्तगत

By admin | Published: February 26, 2017 03:23 AM2017-02-26T03:23:20+5:302017-02-26T03:23:20+5:30

मुंबई विमानतळावर करण्यात आलेल्या पाच कारवायांमध्ये १ कोटी ७७ लाख किमतीचे पाच किलो सोने हस्तगत करण्यात आले. शुक्रवारी रात्रीपासून विमानतळावरील

5 kg gold in Mumbai airport | मुंबई विमानतळावर पाच किलो सोने हस्तगत

मुंबई विमानतळावर पाच किलो सोने हस्तगत

Next

मुंबई : मुंबई विमानतळावर करण्यात आलेल्या पाच कारवायांमध्ये १ कोटी ७७ लाख किमतीचे पाच किलो सोने हस्तगत करण्यात आले. शुक्रवारी रात्रीपासून विमानतळावरील तपास यंत्रणेसह कस्टम विभागाने कारवाईचे सत्र सुरू केले.
केरळ येथील मल्लापुरम्चा रहिवासी असलेला अब्दुल इर्शाद चेलाथदथील याला मुंबई विमानतळावर अडविण्यात आले. तो एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहून मुंबईत आला होता. त्याच्या झडतीत तपास पथकाने ३५ लाख ८२ हजारांचे ११६० ग्रॅम सोने जप्त केले. त्याने अंतरवस्त्रात हे सोने लपवले होते. इर्शाद एका व्यावसायिकाकडे काम करतो. त्याला हे सोने शारजाहून मुंबईत आणण्यासाठी २० हजार रुपये देण्यात आले होते. शारजा येथील सिद्दिकी नावाच्या इसमाने हे पैसे दिल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या कारवाईत हवाई भरारी पथकाने मोहम्मद इलियास ऊर्मी मूगू याच्याकडून १७ लाख ९१ हजार रुपये किमतीचे २८० ग्रॅम सोने हस्तगत केले. तो केरळचा रहिवासी आहे. तो दुबईहून इंडिगो विमानाने मुंबई विमानतळावर उतरला होता. मजुरीची कामे करणाऱ्या इलियास याला दुबई येथील अयुब नावाच्या व्यक्तीने ते सोने मुंबईला नेण्याची जबाबदारी सोपवली होती.
तिसऱ्या घटनेत तुर्किश पासपोर्ट असलेल्या गोखान डेमिर याच्याकडून सोने जप्त करण्यात आले़ हा इस्तंबूल येथून तुर्किश एअर लाइनच्या विमानाने मुंबई विमानतळावर उतरला़ हवाई भरारी पथकाने केलेल्या तपासणीत त्याच्याकडे १ किलो सोने सापडले़ त्याने शरीरावरील बेल्टमध्ये सोने लपविले होते. या सोन्याची किंमत ९२ लाख ६४ हजार इतकी आहे. गोखान याला अटक करण्यात आली आहे.
या कारवाई पाठोपाठ नयना शांतीलाल घघाडा या महिलेला अटक करण्यात आली. तिच्या झडतीत १२ लाख १० हजार किमतीच्या ३९२ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारे हवाई भरारी पथकाने एका रात्रीत केलेल्या चार कारवायांत १ कोटी ७७ लाखांचे ५ किलो सोने हस्तगत केले. (प्रतिनिधी)

परदेशी चलनही आढळले : दुबईहून स्पायजेट विमानाने मुंबई विमानतळावर उतरलेल्या हरेश वासुदेव कुकरेजा (३९) यालाही ताब्यात घेण्यात आले. तो उल्हासनगर येथील रहिवासी आहे. त्याच्या संशयित हालचालींमुळे पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्या हॅण्डबॅग व बुटांमधून १४०० अमेरिकन डॉलर्स, ९५ हजार सौदी रियाल्स असे एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचे चलन जप्त करण्यात आले. तो रिअल इस्टेट व्यावसायिकाकडे काम करतो. त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: 5 kg gold in Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.