अकरावीसाठी 5 लाख 75 हजार जागा, पहिल्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 10:56 AM2022-07-24T10:56:36+5:302022-07-24T10:57:27+5:30

पहिल्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक लवकरच

5 lakh 75 thousand seats for 11th, first admission round schedule soon | अकरावीसाठी 5 लाख 75 हजार जागा, पहिल्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक लवकरच

अकरावीसाठी 5 लाख 75 हजार जागा, पहिल्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक लवकरच

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य आणि केंद्रीय मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झाले असल्याने येत्या आठवड्यात अकरावी प्रवेशासाठी पहिल्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. यंदा राज्यात अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी अमरावती, मुंबई , नागपूर, नाशिक, पुणे येथे मिळून तब्बल ५ लाख ७५ हजार ७८५ जागा उपलब्ध आहेत.  

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या उपलब्ध माहितीनुसार अकरावी ऑनलाइन प्रवेशात कॅप फेऱ्यांसाठी ३ लाख ८७ हजार २०८ तर 
कोटा प्रवेशासाठी एकूण १ लाख ८८ हजार ५७७ जागा उपलब्ध आहेत. पुढील नियमित प्रवेश फेरी १ आणि अलॉटमेंट प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होईपर्यंत केंद्रीय व राज्य मंडळाचं विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या भाग २ मध्ये पसंतीच्या महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदवून अर्ज सबमिट करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे. 

प्रवेशासाठी चुरस 
 अकरावी प्रवेशासाठी यंदा केंद्रीय आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांत तीव्र स्पर्धा दिसणार आहे. आयसीएसई मंडळाचे २६ हजार विद्यार्थी यंदा राज्यातून परीक्षेला बसले होते आणि राज्याचा आयसीएसई मंडळाचा निकाल १०० टक्के लागला आहे. 
 सीबीएसई मंडळाचेही राज्यातून ९३ हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते आणि त्यांचा निकालही ९७ टाके लागला आहे. राज्य मंडळाचे तर ८३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण आहेत. 
 दहावीचे सर्वच विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी अर्ज करीत नसले तरी अर्ज करणाऱ्या राज्य मंडळ व केंद्रीय मंडळांमध्ये नामांकित महाविद्यालयांत प्रवेशासाठी असलेली चुरस पाहण्यास मिळणार आहे. 
 

मुंबईतून १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरला 
प्रवेश अर्जाचा भाग २ भरण्याची प्रक्रिया सुरू असून मुंबई विभागातून आतापर्यंत १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम नोंदविले आहेत.
त्यामधील १ लाख २३ हजार ८४० विद्यार्थ्यांनी अर्ज सबमिटही केले आहेत. 
इन हाऊस कोट्यासाठी ५ हजार १३७ , व्यवस्थापन कोट्यासाठी १ हजार ५५७ तर अल्पसंख्याक कोट्यासाठी ८ हजार ४७१ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.    

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध जागा 
विभाग     महाविद्यालये     कॅप फेरी (जागा)     कोटा     एकूण 
अमरावती     ६५    ११७४०        ४४५०    १६१९०
मुंबई     १०१०    २३००१८        १४०६१७    ३७०६३५
नागपूर     १९६    ३९३३५        १५१८५    ५४५२०
नाशिक     ६३    २२०७६        ४४०४    २६४८०
पुणे     ३१०    ८४०३९        २३९२१    १०७९६०
एकूण     १६४४    ३८७२०८        १८८५७७    ५७५७८५

Web Title: 5 lakh 75 thousand seats for 11th, first admission round schedule soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.