५ लाख ८८ हजार चौ. फूट जागा लाटली
By admin | Published: August 31, 2016 03:52 AM2016-08-31T03:52:10+5:302016-08-31T03:52:48+5:30
देशातील उत्तुंग इमारतींपैकी एक असलेल्या मध्य मुंबईतील रॉयल पॅलेसिसमध्ये तब्बल ५ लाख ८८ हजार चौरस फुटांचे बांधकाम हे रेफ्युजी एरियाच्या नावाखाली लाटण्यात आले आहे.
मुंबई : देशातील उत्तुंग इमारतींपैकी एक असलेल्या मध्य मुंबईतील रॉयल पॅलेसिसमध्ये तब्बल ५ लाख ८८ हजार चौरस फुटांचे बांधकाम हे रेफ्युजी एरियाच्या नावाखाली लाटण्यात आले आहे. आठ वर्षांपूर्वी या बांधकामाला मंजुरी देणारे अग्निशमन दलातील अधिकारी अडचणीत आले आहेत़ या प्रकरणाची पालिकास्तरावर लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे़
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०१३मध्ये महापालिकेने या इमारतीला काम बंद करण्याचे आदेश दिले होते़ जनहित मंच या बिगर शासकीय संस्थेनीही या इमारतीमधील अनियमिततांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती़ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयुक्तांनी या इमारतीची पाहणी करून अहवाल तयार केला आहे़ यामध्ये रेफ्युजी एरियामध्येच बिल्टअप क्षेत्राच्या ७४ टक्के जागा लाटली असल्याचे उजेडात आले आहे़ (प्रतिनिधी)
रेफ्युजी एरिया म्हणजे काय?
उत्तुंग इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास रहिवाशांना बचावासाठी रेफ्युजी एरिया असावा, अशी सक्ती करण्यात आली़ त्यानुसार प्रत्येक मजल्यावर अशी जागा सोडण्यात येते़ केवळ आपत्ती काळात या जागेचा वापर होणे अपेक्षित असल्याने त्याचा गैरवापर टाळण्यासाठी टाळे लावले जाते़
याची चौकशी होणार
इमारतीच्या बिल्ट अप क्षेत्राच्या चार टक्के रेफ्युजी एरिया असावा़ मात्र रॉयल पॅलिसेसमध्ये ७४ टक्के रेफ्युजी एरियाच्या नावाने लाटण्यात आली आहे़ येथे अग्निशमन दलाने एवढी मोठी जागा सोडण्याची परवानगी दिलीच कशी,असा सवाल उपस्थित झाला.