एसटी कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:02 AM2020-04-29T02:02:57+5:302020-04-29T02:03:10+5:30
राज्याला कोरोनाशी दोन हात करण्यासाठी एसटी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५ लाख रुपयांचे योगदान दिले आहे.
मुंबई : राज्यासह देशाला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी आर्थिक साहाय्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचे आवाहन केले होते. राज्याला कोरोनाशी दोन हात करण्यासाठी एसटी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५ लाख रुपयांचे योगदान दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी, कर्मचारी, सामान्य नागरिकांनी मदत केली. त्यामुळे राज्यावर ओढवलेल्या संकटात सामाजिक दायित्वातून महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे ५ लाख रुपये मदत केली आहे.