मुंबईत कोविडच्या ५ लाख चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 05:08 AM2020-07-30T05:08:26+5:302020-07-30T05:08:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईकरांसाठी सुखद बाब म्हणजे मागील पाच महिन्यांच्या संघर्षानंतर शहर उपनगरात एकूण कोविड वाढीचा दर ...

5 lakh tests of Kovid in Mumbai | मुंबईत कोविडच्या ५ लाख चाचण्या

मुंबईत कोविडच्या ५ लाख चाचण्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांसाठी सुखद बाब म्हणजे मागील पाच महिन्यांच्या संघर्षानंतर शहर उपनगरात एकूण कोविड वाढीचा दर ०.९७ टक्क्यांवर आला आहे. शहर उपनगरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्क्यांवर असून रुग्ण दुपटीचा कालावधी ७२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. आतापर्यंत शहर उपनगरात कोविडच्या ५ लाख ५ हजार ९८२ चाचण्या झाल्या आहेत.


मुंबईत १ हजार १०९ रुग्ण व ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या १ लाख ११ हजार ९९१ इतकी झाली असून बळींचा आकडा ६ हजार २४७ आहे. आतापर्यंत ८५ हजार ३२७ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २० हजार १२३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


दिवसभरात नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी ४२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ४३ रुग्ण पुरुष व १७ रुग्ण महिला होत्या.
मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ४८ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. तर उर्वरित १० रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आहेत.
शहर उपनगरात झोपडपट्टया आणि चाळीत ६२२ सक्रिय कंटेनमेंट क्षेत्र आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५ हजार ९६० आहे.

धारावी दिवसभरात
केवळ दोन रुग्णांची नोंद

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेली धारावी कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. बुधवारी धारावीत फक्त कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. सध्या या ठिकाणी ८३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. धारावी कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असताना दादर आणि माहिममध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे. बुधवारी माहिम, दादर परिसरात प्रत्येकी २५ रुग्ण सापडले. तीन महिन्यांपूर्वी धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट होता, मात्र धारावीतील कोरोना नियंत्रणाचे केंद्रानेही कौतुक केले. धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा २ हजार ५४५ वर गेला आहे. यातील २ हजार २१२ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

मुंबईत कोरोनाचे आणखी ६० बळी
मुंबईत १ हजार १०९ रुग्ण व ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ११ हजार ९९१ इतकी झाली असून बळींचा आकडा ६ हजार २४७ आहे. आतापर्यंत ८५ हजार ३२७ रुग्ण कोविडमुक्त झाले असून, सध्या २० हजार १२३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २० लाख १६ हजार २३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.८७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: 5 lakh tests of Kovid in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.