Join us

राज्यातील १०० टक्के पीयूसी सेंटर ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 5:38 AM

वाहनचालकांची फसवणुकीपासून होणार सुटका

- नितीन जगताप मुंबई : केंद्र सरकारने वाहनांची पीयूसी (वायुप्रदूषण तपासणी) आॅनलाइन करण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार राज्यात आरटीओ त्याची अंमलबजावणी करत आहे. राज्यातील ५० आरटीओमध्ये एकूण २२०० पीयूसी सेंटर आहेत. यातील १०० टक्के पीयूसी सेंटर आॅनलाइन असून ३१ डिसेंबरपर्यंत त्यामधील २,३२२ मशीन आॅनलाइन झाल्या आहेत, अशी माहिती आरटीओने दिली.एखाद्या वाहनाची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र घेतल्यानंतरच वाहन रस्त्यावर आणता येते. अन्यथा १० हजार रुपये दंड व सहा महिन्यांपर्यंत शिक्षा भोगावी लागते. आतापर्यंत सर्वाधिक मुंबईत ४४१ पीयूसी मशीन आॅनलाइन करण्यात आल्या. तर सर्वात कमी ५ पीयूसी मशीन बीडमध्ये आॅनलाइन केल्या. पुण्यात २०८, तर ठाण्यात १५० पीयूसी मशीन आॅनलाइन करण्यात आल्या आहेत.केंद्राने एप्रिलपासून आॅनलाइन पीयूसीची सक्ती केली. मात्र, पीयूसी चालकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आॅनलाइन पीयूसीला स्थगिती दिली. ही बंदी सप्टेंबरमध्ये उठवली. तरीही कित्येक ठिकाणी आॅफलाइन पीयूसी होती. आरटीओने आॅनलाइन पीयूसी न केल्यास कारवाई करू, अशी नोटीस पीयूसी चालकांना पाठविली. आता १०० टक्के सेंटर आॅनलाइन झाल्याने वाहनचालकांची फसवणुकीपासून सुटका होईन, असे आरटीओने सांगितले.मुंबईत सर्वाधिक ४४१ पीयूसी मशीन आॅनलाइनपीयूसी सेंटर आॅनलाइन करण्याच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने बऱ्याच मालकांनी आपले पीयूसी सेंटर बंद केले होते. तसेच कित्येक पेट्रोलपंपांवर पीयूसी बंद होते. त्यामुळे वाहनचालकांना पीयूसीसाठी भटकंती करावी लागत होती. परंतु आता मुंबईतील ताडदेव १०८, अंधेरी ७३, वडाळा १३४ व बोरीवली १२६ या आरटीओतील एकूण ४४१ मशीन आॅनलाइन झाल्या आहेत. आतापर्यंत सर्वाधिक पीयूसी मशीन आॅनलाइन करण्यात मुंबई पहिल्या स्थानी आहे.बनावट पीयूसीला चापआॅनलाइन पीयूसी सुरू करत असताना काही वाहनांची आॅफलाइन पीयूसी काढण्यात आली होती. येत्या सात ते आठ महिन्यांत सर्व वाहनांची पीयूसी आॅनलाइन होईल. त्यामुळे काही पीयूसी चालक वाहनचालकांची फसवणूक करत होते, पण आता सर्व आॅनलाइन असल्याने त्याला आळा बसेल.- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त