Join us

पाचही शिक्षकांचे ‘सीडीआर’ काढले!

By admin | Published: April 14, 2017 3:54 AM

दहिसरच्या शाळेतून दहावीच्या उत्तरपत्रिका गायब झाल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी शाळेतील शिक्षकांचे कॉल रेकॉर्ड डाटा (सीडीआर) काढले आहेत.

मुंबई : दहिसरच्या शाळेतून दहावीच्या उत्तरपत्रिका गायब झाल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी शाळेतील शिक्षकांचे कॉल रेकॉर्ड डाटा (सीडीआर) काढले आहेत.उत्तरपत्रिका चोरीची तक्रार या शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पाठक यांनी केली होती. पाठक जेव्हा बाहेर गेले नेमक्या त्याच वेळी भंगाराच्या नावाखाली एका इसमाने पेपरचे गठ्ठे उचलले आणि तो पसार झाला. यावरून पाठक केबिनमधून बाहेर पडल्याची माहिती उत्तरपत्रिका चोराला दिली गेली आहे. त्यानुसार आधी याबाबत फोनवर काही संभाषण झाले आहे का? हे पडताळून पाहण्यासाठी शाळेच्या पाचही शिक्षकांचे सीडीआर काढले आहेत. सध्या ते पडताळले जात आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मात्र, मोबाइल टू मोबाइल फोन झाल्याची शक्यताही फार कमी आहे. कारण सध्या व्हॉट्स अ‍ॅप सारख्या इंटरनेट कॉलिंगची सोय उपलब्ध आहे. त्याचे रेकॉर्ड सहजासहजी मिळवणे शक्य नाही. मात्र, शाळेच्या शिक्षकांसह येथील अन्य कर्मचारीही संशयाच्या ‘रडार’वर आहेत. तसेच हा प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)स्थानिकांचीही चौकशीदहिसरच्या या शाळेच्या आसपास अत्यंत दाटीवाटीने झोपडपट्टी वसलेली आहे. शाळेच्या वर्गाच्या अगदी समोर चाळ आहे. तेथून सतत लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे पोलिसांनी या चाळीतील लोकांकडेही चौकशी केली. मात्र, कोणाही संशयिताला पाहिल्याचे त्यांना आठवत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.