मुंबईत ५ हजार ३६९ रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:08 AM2021-02-11T04:08:14+5:302021-02-11T04:08:14+5:30
मुंबई – मुंबईत बुधवारी ४७६ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत २ लाख ९५ हजार ५२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
मुंबई – मुंबईत बुधवारी ४७६ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत २ लाख ९५ हजार ५२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५५ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ५ हजार ३६९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील वर्षाच्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मुंबईत पहिल्यांदा दैनंदिन मृत्यूसंख्या १० च्या खाली आहे.
मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २९ लाख ४९ हजार ६७५ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५५८ रुग्ण आणि ४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, बाधितांची एकूण संख्या ३ लाख १३ हजार २०६ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ४०० आहे.
मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या १४७ असून १ हजार ८५६ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने २ हजार ९ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.